Friday, June 19, 2026
Homeबीज उगवण क्षमतामूल येथील कृषी महाविद्यालय च्या विद्यार्थिनींकडून बीज उगवण प्रात्यक्षिक - शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषी महाविद्यालय च्या विद्यार्थिनींकडून बीज उगवण प्रात्यक्षिक – शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुल-मरोडा येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी 15 जून 2026 रोजी  सिंदेवाही तालुक्यातील किन्ही गावात “बीज उगवण चाचणी” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम घेतला. या उपक्रमात मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या  RAWE विद्यार्थिनी कु.. भाग्यश्री घागी, कु.. हिरल गोंगले,  कु.प्रणाली गुरनुले, कु.. मोनाली हातिमारे आणि कु. आचल कडस्कर यांनी प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना बियाणे पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. , पोत्याची पद्धत वापरून बी टाकून उगवण कशी मोजावी, याची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. प्रमाणित बियाणे व घरचे बियाणे यातील फरक, निळा टॅग व हिरवा टॅग असलेल्या बियाण्यांची गुणवत्ता याबाबतही मार्गदर्शन केले.

किन्ही गावातील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “पोरींनी जे समजावून सांगितलं ते एकदम सोपं होतं. आता आम्ही पण पेरणीआधी बी तपासून बघू,” अशा भावना शेतकरी. लोमेश गुरनुले आणि इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. अनेक शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया, बियाण्याची साठवण व उगवण न होण्याची कारणे याबाबत प्रश्न विचारले, ज्याचे विद्यार्थिनींनी समाधानकारक उत्तरे दिली.

     मूल येथील कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे , कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषि संशोधन केंद्र प्रभारी डॉ. प्रविण देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे आणि विशेषज्ञ प्राध्यापक डॉ. सुवर्णा नगराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांना दर्जेदार निवड उपयुक्त उत्पादनात वाढ ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!