मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कन्यांनी मारोडा येथे 17 जून 2026 ला ग्रामीण कृषी कार्यानुभव ( RAWE ) या उपक्रमा अंतर्गत रमेश मुरस्कार आणि इतर शेतकऱ्यांना बियाणे प्रक्रिया त्याचप्रमाणे निरोगी पिकासाठी कोणत्या प्रकारचा उपाय करावा याबाबत मार्गदर्शन केले
बियाणे प्रक्रिया : निरोगी पिकासाठी प्रभावी उपाय
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्याने बियाणे व जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाच्या वापरामुळे बियाण्याची उगवण क्षमता सुधारते, रोपांची सुरुवातीची वाढ चांगली होते आणि पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या कृषी कन्या कु. राधिका डोंगरवार, कु. संस्कृती इटकलवार,कु. स्वानंदी गाडगे कु. दृष्टी गायकवाड यांनी मारोडा येथील शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.



