Sunday, June 21, 2026
Homeबीज उगवण क्षमताकृषी महाविद्यालय मुल च्या विद्यार्थिनींनी भाताच्या बियाण्याची उगवण बद्दल माहिती दिली

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मुल च्या विद्यार्थिनींनी भाताच्या बियाण्याची उगवण बद्दल माहिती दिली

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी भाताच्या बियाण्यांची चांगली उगवण व्हावी आणि रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी बेलगाता येतील शेतकऱ्यांना आवश्यक असे मार्गदर्शन केले. या उपक्रमात कृषी महाविद्यालयाच्या कु. श्रिया बोधे, कु. गणिका बुधे, कु. स्नेहल भोयर, आणि कु. समृद्धी गडगेलवार या विद्यार्थिनी नी बेलघाटा येथील शेतकरी चंद्रशेखर येरणे, दिलीप उईके, अजय त्रिपत्तीवार,  भास्कर चंदनखेडे व इतर शेतकऱ्यांना भाताच्या बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी व रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी ट्रायकोडर्मा बियाणे प्रक्रिया बाबत माहिती दिली. प्रथम बियाणे मिठाच्या (Brine) द्रावणात टाकून हलकी व निकृष्ट बियाणे वेगळी करण्यात आली. त्यानंतर निवडलेली बियाणे स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवली. वाळवलेल्या बियाण्यांवर शिफारशीनुसार ट्रायकोडर्मा पावडर एकसारखी लावण्यात आली. प्रक्रिया केलेली बियाणे काही वेळ सावलीत ठेवून नंतर पेरणीसाठी वापरण्यात आली.


विद्यार्थिनींनी सांगितले की,या प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोपे जोमदार व निरोगी बनतात तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ट्रायकोडर्मा मुळांच्या वाढीस चालना देते व पोषक द्रव्यांचे शोषण सुधारते. ही एक पर्यावरणपूरक व कमी खर्चाची जैविक पद्धत आहे. रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होते आणि पिकाची प्रारंभिक वाढ चांगली होऊन उत्पादनवाढीस हातभार लागतो.

      कृषि महाविद्यालय मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी.अतकरे यांच्या प्रेरणेतून प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. गजभिये, डॉ. एस.आर.मुन्नरवार, डॉ. गीतांशू डिंकवार, डॉ. ए. जे. इंगोले आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.नागेश नवघरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी करण्यात आला. 

.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!