Sunday, June 21, 2026
Homeयोग दिवसबल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मूल ( मेहुल मनियार )

         21 जून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज बल्लारपूर पब्लिक स्कूल मध्ये  मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध योग शिबिरे, प्राणायाम व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.आणि शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी योग प्रशिक्षक यांचे स्वागत केले आणि नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचे महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमादरम्यान योग प्रशिक्षिका रोहिणी बनकर, आरती चेपूरवार, रंजना चौधरी आणि शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना निरोगी व संतुलित जीवनशैलीसाठी दररोज योग करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची प्रतिज्ञा घेतली.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!