Saturday, August 22, 2026
Homeविश्व एड्स दिवसजागतिक एड्स दिवस यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

जागतिक एड्स दिवस यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून देवनील कॉलेज ऑफ नर्सिंग मुल  ( आकापूर ) येथील विद्यार्थ्यांना उप जिल्हा रुग्णालय मूल च्या तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तसेच मौखिक आरोग्य व एड्स विषयक मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर स्मिता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात  प्राचार्या भावना टेकाम, ममता शेंडे एन सी डी समुपदेशक, विजया शिवणकर एनसीडी स्टाफ नर्स उपजिल्हा रुग्णालय मुल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली, व ममता शेंडे यांनी मार्गदर्शन केले.

 

उपजिल्हा रुग्णालय मुल येथील समुपदेशक मीना नंदनवार यांनी एचआयव्ही एड्स यातील फरक, एच आय व्ही पसरण्याची कारणे व लक्षणे , भेदभाव व कलंक, उपचार, व आर टी आय एस टी आय यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमाला  मिनू रामटेके, स्नेहल कोसरे, प्रतीक्षा जल्लेवार, वैशाली भरडकर , वैष्णवी बघेल आदी शिक्षक वर्गांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन फाल्गुनी जराते व आभार प्रदर्शन मनाली घुबडे या विद्यार्थिनींनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!