Saturday, August 22, 2026
Homeस्नेह मिलनपुन्हा एकदा... कर्मवीर महाविद्यालयाच्या आठवणी....वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

पुन्हा एकदा… कर्मवीर महाविद्यालयाच्या आठवणी….वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

image_pdfimage_print

वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी केला गुरुजनांचा सत्कार 
मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

कर्मवीर महाविद्यालयात सत्र 2001- 2002 मध्ये बारावी ( वाणिज्य ) वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांतर्फे गुरुजनांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सोमनाथ येथील शिव फॉर्म मध्ये आयोजित केलेल्या स्नेह मिलन सोहळ्याच्या कार्यक्रमात माजी प्राचार्य ते. क. कापगते, प्रा. व्ही. यु. पुस्तोडे, प्रा. चंद्रकांत मणियार, प्रा. मारोती पूल्लावार, प्रा. जी. एन. सहारे, प्रा. सुधीर नागोसे, प्रा. धनंजय चुदरी, प्रा. डॉ. किरण कापगते, आदी उपस्थित होते.


प्रा. चैतन्य पुप्पलवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गुरुजनांना शुभेच्छा देत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गुरुजनांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात राहुल कोंतमवार , कविता मडावी, आनंद खजानची या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील वेगवेगळ्या घडामोडी आणि गुरुजनांच्या मार्गदर्शना बद्दल आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. चंद्रकांत मणियार, प्रा. मारोती पुल्लावार, प्रा. सुधीर नागोसे आणि प्रा. व्ही. यु. पुस्तोडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या स्नेहमिलन सोहळ्याचे कौतुक करतांना गुरुजनांबद्दल आदर व्यक्त व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची प्रशंशा केली. सर्व विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेह मिलन सोहळ्याचे सुंदर संचालन विद्या कोसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आनंद खजानची यांनी मानले. विद्या कोसे यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाला अधिक शोभा आली. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खेळ आयोजित करून या स्नेह मिलन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी नी खुप परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!