Saturday, August 22, 2026
Homeबस स्थानक निरीक्षणहिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'स्वच्छ, सुंदर बस स्थानके' अभियानांतर्गत मूल बस स्थानकाची...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ, सुंदर बस स्थानके’ अभियानांतर्गत मूल बस स्थानकाची पाहणी 

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ आणि सुंदर बस स्थानके’ अभियानांतर्गत, ‘अ’ श्रेणीत येणाऱ्या चंद्रपूर विभागाच्या मूल बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, प्रादेशिक अभियंता रमेश कांबळे, लोकमत समाचार चे प्रा.चंद्रकांत मनियार, जागृती ग्राहक राजा नागपूर आणि प्रवासी संघाचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय प्रादेशिक मूल्यांकन समितीने या बस स्थानकाची पाहणी केली.

या मोहिमेअंतर्गत ‘अ’ श्रेणीतील बस थांब्यांचे चार वेळा मूल्यांकन होणार ज्यात हे चौथे व शेवटचे मूल्यांकन आज करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बस स्थानकाला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

बसस्थानकाचे मूल्यांकन करताना, समितीने बसस्थानकावरील शौचालयांची योग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिशादर्शक माहिती फलक, परिसराची स्वच्छता, बसस्थानकाचे नाव आणि फलाटावरील गावनिहाय फलक यांची पाहणी केली. समितीने वेळापत्रक, घोषणा प्रणाली, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना, डेपो आणि डेपो व्यवस्थापकांचे मोबाईल क्रमांक, तसेच बसस्थानकावरील चौकशी खिडकी, चालक आणि वाहकांसाठी विश्रामगृह, आरक्षण सुविधा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, व्यावसायिक आस्थापने आणि पार्किंगची व्यवस्था यांचीही पाहणी केली.

मूल्यांकन समितीने आशा व्यक्त केली आहे की, प्रशासनाला प्रवाशांचे सहकार्य मिळाल्यास, हे बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर राहील तसेच स्पर्धेत अव्वल स्थानही मिळवेल.

या तपासणी दरम्यान, परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर च्या वाहतूक निरीक्षक कविता बसू, मूल चे बस स्थानक नियंत्रक सातपुते, विभा बोथले इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी अधिकारी वर्गाशी चर्चा करताना मुल वरून नागपूर तसेच औरंगाबाद साठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!