Saturday, August 22, 2026
Homeपशु लसीकरणपशुधनाला आरोग्याचे कवच: गोठ्यातच लसीकरणाची संजीवनी.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

पशुधनाला आरोग्याचे कवच: गोठ्यातच लसीकरणाची संजीवनी.

image_pdfimage_print

आधुनिक कृषी व्यवस्थापनात पशु लसीकरण शिबिराला‌ शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद.

. निरोगी पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खरे परिवर्तन.

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

     डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव रावे (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषी दुतांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील इंदाळा या गावात पशु लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. कृषि दुतातर्फे  जनावरांचे लसीकरण याबाबत हाती घेतलेली लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. कृषी दुतान मार्फत आयोजित दि.२८/७/२०२६ जनावरांचे, पशु लसीकरण शिबिर याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले.

लसीकरण शिबिरासाठी कनेरी ,पारडी, व इंदाळा या तिन्ही गावातील कृषी दुतानी एकत्र येऊन जनावरांची लसीकरण मोहीम यशस्वीरित्या इंदाळा या गावात एकत्र येऊन पार पाडली. सदर लसीकरण शिबिर करते वेळी पशुवैद्यकीय दवाखाना,पारडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर व पशु वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित असून कृषी दूतांनी यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर लसीकरण मोहीम पार पाडण्यात आली.

कृषी दूतांनमार्फत शेतकऱ्यांना विविध लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले. जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढ, रोगमुक्तता, आजार नियंत्रण, सुदृढ आरोग्य, दूध उत्पादनात वाढ, आजार व रोग प्रतिकारक क्षमता वाढते, जनावरांचे लसीकरण केल्यामुळे जनावरांचे जीवघेण्या आजारांपासून संरक्षण होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दूध-मांस उत्पादनात वाढ होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येते.जनावरांच्या शरीरात आजारांशी लढण्याची ताकद निर्माण होते.जीवघेणे आजार टळतात: लाळ्या खुरकूत, फऱ्या, लंपी,घाणसर्प आणि रेबीज यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षा मिळते.लाळ खुरकूत (FMD): तोंडात व खुरांमध्ये फोड येणे, लाळ गळणे आणि चालताना लंगडणे.बुळकांडी रोग: शरीराचे तापमान १०४° ते १०७° फॅरेनहाईटपर्यंत वाढणे, तोंडाबाट लाळ व डोळ्यांतून स्राव येणे.स्तनदाह (Mastitis): सड किंवा कासेला सूज येणे, दूध कमी होणे आणि दुधाचा रंग बदलणे.पायकूज (Foot Rot): खुरांना इजा होऊन किंवा चिखलात राहिल्याने खूर सडणे आणि पू होणे.प्रतिबंध व काळजी घ्यावी ,गोठा कायम स्वच्छ व कोरडा ठेवावा.वेळेवर पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करावे.दूषित अन्न व पाणी जनावरांना देणे टाळावे.मृत्यूचे प्रमाण घटते: अचानक जनावरे दगावण्याचे प्रमाण खूप कमी होते.उत्पादनावर होणारा परिणामउत्पादन वाढते: जनावरे निरोगी राहिल्यामुळे दूध आणि मांस उत्पादनात वाढ होते.आर्थिक बचत होते: आजारपणात औषधोपचारावर होणारा मोठा खर्च वाचतो.उत्पादनाची प्रत सुधारते: जनावरांचे स्वास्थ्य उत्तम राहिल्यामुळे दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरतो.मानवी आरोग्यासाठी फायदामाणसांना संसर्ग रोखतो: जनावरांपासून माणसांमध्ये पसरणारे आजार (झूनोटिक डिसीज) टाळता येतात.सुरक्षित अन्न पुरवठा: मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आणि पोषक दुग्धजन्य पदार्थ मिळतात. असे अनेक फायदे व अगणित उपयोग सांगून कृषीदुतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्षतः शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुवैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केले त्यामध्ये प्रामुख्याने इंटेरोटॉक्सिनिया व्हॅक्सिन, गोटबॉक्स वॅक्सिन, लंपी वॅक्सिंग, मसटायटीस, ब्लॅक कॉर्टर व्हॅक्सीन, व रोग प्रतिबंधात्मक लसीकरण इत्यादी जनावरांच्या वर्गवारी नुसार व गरजेनुरूप करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने गाय, बैल ,म्हैस ,शेळ्या व मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण शिबिराला शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व जनावरांना लसीकरण करून पशुलसीकरणाचा लाभ घेण्यात आला.

        मुल येथील कृषी महाविद्यालय चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे , सोनापुर,गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, प्रभारी डॉ.गणवीर, डॉ. सतीश मुन्नरवार व डॉ.प्रवीण घुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.व यामध्ये प्रामुख्याने उपस्थित गावातील गावकरी, तरुण वर्ग, आणि शेतकरी यांनी उपस्थित होऊन आपला अमूल्य सहभाग नोंदवला.

हा उपक्रम खरोखर समाधानकारक व प्रेरणादायी ठरला असून. व यशस्वीरित्या पार पडला असे उपस्थितांचे मत आहे. लसीकरण ही केवळ गरज नसून तर ती भविष्यातील संजीवनी आहे.निरोगी पशुधन, समृद्ध गोठा: आणि पशुधनाच्या रक्षणासाठी लसीकरण क्रांतीचे पर्वच म्हणावे लागेल.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!