Wednesday, August 26, 2026
Homeमार्गदर्शनMCAER PG-CET परीक्षेबाबत मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

MCAER PG-CET परीक्षेबाबत मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        कृषि महाविद्यालय, मुल येथे दिनांक २४ ऑगस्ट, २०२६ रोजी “MCAER PG-CET परीक्षेची तयारी” या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आणि “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार” समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेची योग्य दिशा मिळावी, तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. व्हि. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात  डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग यांनी केली. त्यांनी MCAER PG-CET परीक्षेचे कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधींचा गांभीर्याने विचार करून स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला वेळेत सुरुवात करण्याचे आवाहन केले.


उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. आर. पी. गजभिये, यांनी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच, कृषि महाविद्यालय, मुल यांच्यासाठी MPSC परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट केली. विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला चालना देण्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. उपलब्ध करून देण्यात आलेल्या संदर्भसाहित्यामुळे विद्यार्थ्यांना MPSC तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासाची अधिक चांगली संधी मिळणार आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी MCAER PG-CET, 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी कृषी व उद्यानविद्या विषयांमध्ये राज्यस्तरीय मानांकन प्राप्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे आहेत :१. गुरनुले मानसी रमेश (कृषी Rank ११ व उद्यानविद्या Rank १६) २. भैसारे ऋतुजा दिलीप (कृषी Rank १४ व उद्यानविद्या Rank २०) ३. बोरकर किरण गजानन (कृषी Rank ३२ व उद्यानविद्या Rank २९) ४. पाटील हर्षिता मनीष (कृषी Rank ३५ व उद्यानविद्या Rank २८) ५. चिखलोंडे राहुल साहेबराव (कृषी Rank ३६ व उद्यानविद्या Rank ३५) ६. धानोरे शाम सुधीर (कृषी Rank ३६ व उद्यानविद्या Rank ४३) ७. पंचभाई प्रांजली नंदलाल (कृषी Rank ३८ व उद्यानविद्या Rank ३८) ८. जुनगारी बलवीर नागेश (कृषी Rank ३६ व उद्यानविद्या Rank ४३) ९. वाकडे ओमप्रकाश अनिल (कृषी Rank ४७ व उद्यानविद्या Rank ४३) १०. देओकर जाह्नवी पंकज (कृषी Rank ४७) ११. चव्हाण मिनल रतांसिंग (कृषी Rank ४८ व उद्यानविद्या Rank ३४) १२. भूषण हावरे (कृषी Rank ५२ व उद्यानविद्या Rank ४१) १३. उपरीकर समय मनोज (कृषी Rank ५२) १४. बेलेकर चैताली विजय (कृषी Rank ५५ व उद्यानविद्या Rank ६२) १५. गावंडे विपश्यना जिवन (कृषी Rank ५७ व उद्यानविद्या Rank ३८) १६. फुलझेले रिया रमेश (कृषी Rank ५९) १७. किनाके कुंदन रवींद्र (कृषी Rank ६३ व उद्यानविद्या Rank ६४)
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या राज्यस्तरीय क्रमांकांमुळे कृषि महाविद्यालय, मुलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेषतः गुरनुले मानसी रमेश यांनी कृषी विषयात ११ वा क्रमांक (७८.५०%), तर भैसारे ऋतुजा दिलीप यांनी १४ वा क्रमांक (७७.००%) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. उद्यानविद्या विषयातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून उल्लेखनीय राज्यस्तरीय क्रमांक मिळविले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे बीएस्सी. (हॉनर्स) कृषिच्या विद्यार्थ्यांना MCAER PG-CET परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन, विषयानुसार तयारी, संदर्भग्रंथांचा वापर, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव, नियमित पुनरावृत्ती, वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या आधारे स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविता येते, असा प्रेरणादायी संदेश महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना MCAER PG-CET परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनातून एक बाब प्रकर्षाने मांडण्यात आली ती म्हणजे त्यांच्या उत्तुंग यशाच्या मागे सर्वच प्राध्यापक वर्गाने संबंधित विषयाचे केलेले सखोल मार्गदर्शन व मा. सहयोगी अधिष्ठाता यांनी उपलब्ध करून दिलेल्या सर्व सोयीसुविधा व यामुळे शक्य झाल्याचे सांगितले.
डॉ. गजभिये यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या यशामागील मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे ही महाविद्यालयीन संस्कृतीची सकारात्मक बाब असून, एका विद्यार्थ्याचे यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. MCAER PG-CET ची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे सखोल आकलन करून मूलभूत संकल्पना स्पष्ट कराव्यात, नियमितपणे सराव करावा आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी  आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या संधींचा विचार करावा, असे प्रतिपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास यामुळे निश्चितपणे यश संपादन करता येते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक साधने, मार्गदर्शन सुविधा, प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच यांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
MCAER PG-CET मध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेली उल्लेखनीय कामगिरी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, त्यांच्या अनुभवातून मिळालेले मार्गदर्शन आणि MPSC परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भपुस्तकांचे योगदान या सर्व उपक्रमांमुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व स्पर्धात्मक विकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची आकांक्षा, स्पर्धात्मक परीक्षांची जाणीव आणि यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक  डॉ. गितांशु डिंकवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!