Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025३ दशकांची निष्ठा आणि सामान्य घराची शक्ती—प्रभाग 1 मध्ये कमळ फुलण्याचा दीशेत...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

३ दशकांची निष्ठा आणि सामान्य घराची शक्ती—प्रभाग 1 मध्ये कमळ फुलण्याचा दीशेत : अजय गोगुलवार आणि संजना मडावी चर्चेत

image_pdfimage_print

मूल

नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपकडून उभे असलेले उमेदवार अजय गोगुलवार आणि संजना मडावी यांची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा, समाजातील सक्रियता आणि पक्षनिष्ठा लक्ष वेधून घेत आहे.

अजय गोगुलवार

अजय गोगुलवार हे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती कार्यकर्ते. जवळपास 3 दशके त्यांनी कोणत्याही पदाच्या लालसेशिवाय भाजपची निष्ठेने सेवा केली आहे. जेव्हा पण पक्षश्रेष्ठीने जे-जे आदेश दिले ते तत्परतेने पूर्ण केले आहे. व्यावसायिकदृष्ट्या LIC एजंट असल्याने त्यांचा जनसंपर्क आणि लोकांशी संवाद प्रभावी आहे. मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनात काम करताना मजबूत नेतृत्वक्षमता विकसित केली आहे.मागील नगरपरिषदेच्या कार्यकाळात स्वीकृत सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य जनतेच्या पसंतीस उतरले होते.

या निवडणुकीत पक्षाने दिलेली प्रभाग 1 मधील उमेदवारी ते शांत, संयमी आणि तळमळीच्या कार्यपद्धतीने निभावण्यास सज्ज आहेत.लोकांना होणाऱ्या समस्येचे निवारण करण्याची तळमळ त्यांच्यात असल्यामुळे, त्यांचं नेतृत्व प्रभाग वासियांसाठी फायदेशीर ठरेल.प्रभागात त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा असून “ही जागा सहज जिंकू” असा आत्मविश्वास स्थानिक मतदारांमध्येही दिसून येत आहे.

संजना मडावी

सामान्य घरातील महिला, पण कामात दमदार संजना मडावी या अनुसूचित जमाती प्रवर्गातील साधारण घरातील महिला,पण महिलांसाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. साधी-सरळ पण धडाडीची प्रतिमा, लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता आणि कामाबद्दलची प्रामाणिकता यामुळे विरोधकांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत.बदल घडवण्याची जिद्द आणि “सामान्य घरातील महिला देखील प्रभागाचे नेतृत्व करू शकते” हा संदेश त्या देत आहेत.

प्रभाग 1 मधील दोन्ही भाजप उमेदवारांचा जनाधार मजबूत असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. डॉ. किरण कापगते यांना या प्रभागातून मोठा फायदा होईल, अशी चर्चा प्रभागवासीयांमध्ये रंगली आहे.म्हणूनच, प्रभाग 1 मध्ये भाजपची जोडी,अजय गोगुलवार आणि संजना मडावी,ही निवडणुकीत सर्वाधिक प्रभावी जोडी ठरणार, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!