Friday, August 21, 2026
Homeसावित्री बाईं फुले जयंतीकर्मवीर महाविद्यालय, येथे सावित्रीबाई फुले जयंती व परीक्षा गैरमार्ग प्रतिबंध उद्बोधन कार्यक्रम...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, येथे सावित्रीबाई फुले जयंती व परीक्षा गैरमार्ग प्रतिबंध उद्बोधन कार्यक्रम संपन्न

image_pdfimage_print

 

मूल ( मेहुल मनियार )

       शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले जयंती तसेच परीक्षा गैरमार्ग प्रतिबंध उद्बोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवभारत कन्या विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शुभांगिनी वैरागडे  उपस्थित होत्या.  प्रमुख पाहुण्या म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके तसेच रामटेके यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकाही मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमित धोडरे यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्रीसक्षमीकरणातील योगदानाचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

 विद्यार्थिनींनीनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त करताना सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नसून समाजजागृतीच्या प्रेरणादायी प्रतीक असल्याचे गौरवले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीशिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, हे आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

         अध्यक्षीय भाषणात सौ. शुभांगिनी वैरागडे यांनी सांगितले की,“ शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व घडविणारे साधन आहे. सावित्रीबाई फुले यांनी याच ध्येयाने आयुष्य व्यतीत केले. त्यांचा आदर्श आपल्या आचरणात उतरविणे हीच खरी जयंती ठरेल.”

प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा प्रामाणिकपणे देण्याचे आवाहन करत म्हटले,
“परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर अन्याय करणे होय. प्रामाणिकपणे केलेला प्रयत्नच खरा यशस्वी ठरतो.”तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारक कार्याची प्रेरणादायी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूनम मुनगंटीवार यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. श्वेता दूधकोवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त संपूर्ण परिसरात प्रेरणादायी व समाजजागृतीचे वातावरण निर्माण झाले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!