Friday, August 21, 2026
Homeवार्षिक स्नेह संमेलनकृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

image_pdfimage_print

मूल ( चंद्रकांत मनियार )

पंजाबराव कृषी विद्यापीठ संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्थानीय कन्नमवार सभागृहात 10 मार्च ला सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन समारोह पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होत असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ. शेखर डोंगरे,  विद्यापीठाचे डीन डॉ. डी एम पंचभाई, डॉ. एस.एस.माने डॉ. डी. बी.उंदीरवाडे, श्रीमती प्रीती रोडगे, आर. आर. कटरे, डॉ. ए. व्ही. कोल्हे आदी गणमान्य उपस्थित राहतील.
या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, वादविवाद, प्रश्नोतरी आदी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना 11 मार्च ला आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार दिले जाणार आहेत.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वी. जी. अतकरे यांच्या नेतृत्वात आणि डॉ. रमाकांत गजभिये, डॉ. गीतांशू डिंकवार यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभत आहे..

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!