मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
वयाचे 75 वर्ष पूर्ण होऊन मुल येथील आनंदराव शेंडे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात मोठ्या आनंदात साजरा केला. पावसाचे दिवस असूनसुद्धा सारेच आप्त आणि त्याच्या सहचर्यात आलेले बालपण, उमेदीचा काळ व आत्ताच्या सुखविलासातील काळातील मित्रपरिवार… अशा सर्वांनी हजेरी लावली. वेगवेगळ्या कार्यातून आपल्या जीवनाचा प्रवास करताना आनंदराव यांना शेती व्यवसायात अधिक आवड असल्याबाबत याप्रसंगी बोलून दाखविले.




७५ वर्षांचा हा अमृतमहोत्सवी टप्पा गाठणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आयुष्यभराच्या अनुभवातून, कष्टातून, प्रामाणिकपणातून आणि संस्कारातून अनेकांना प्रेरणा देणारे हे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध आहे.
