मुल (प्रा. चंद्रकांत मनियार )
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे मौजे कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली येथे कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषी दुतान मार्फत १ जुलै रोजी कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे मा. कुलगुरू डॉ.शरदराव गडाख यांच्या सूचनेनुसार कृषि सप्ताह साजरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने कृषि महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा. कनेरी, ता. जि. गडचिरोली येथे कृषि सप्ताहाच्या निमित्ताने कृषीदूतांनमार्फत शेतकऱ्यांना शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीबद्दल विविध कल्याणकारी योजना, शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, फळ बागलागवड, शेतीपूरक व्यवसाय, पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन, अशा अनेक विषयांवरती प्रत्येकी सातही दिवशी कृषि दुतान मार्फत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील बांधावर भेटी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करून विषायाणुरूप योग्य ती चर्चा व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
१ जुलै –
कृषी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कनेरी गावातील ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला व या कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालय मुल, कृषी संशोधन केंद्र सोनापूर, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली येथील उद्यानविद्या विभागाचे कृषी तज्ज्ञ डॉ. सूचित लाकडे होते, तर उद्घाटक म्हणून कणेरीचे सरपंच श्री. तुषार मडावी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी व कृषी विस्तारशाखा विषय तज्ञ डॉ. आशिष लाडे, व कृषी अभियांत्रिकी विषय तज्ञ डॉ. अमरदीप डेरे, तसेच कृषी महाविद्यालय सोनापूर येथील उद्यानविद्या विभाग विषयतज्ञ प्रणाली भैसारे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रशेखर जक्कनवार, श्री. नेताजी लोंडे, श्री. शामजी कोलते, श्री. प्रभाकर लाकडे, पोलीस पाटील श्री. गणेशजी मडावी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कनेरी येथील मुख्याध्यापक श्री. युवराज मांडले उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत विद्यार्थी अथर्व डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गुरुदेव आसोले यांनी मानले.
२ जुलै –
मशागतीसाठी वापरण्यात येणारी कृषी अवजारे (Engineering Tools of Preparatory Tillage Operation)
जमिनीची मशागत करण्यासाठी विविध कृषी अवजारांचा वापर केला जातो.
मुख्य अवजारे:
नांगर (Plough), कुळव (Harrow),रोटाव्हेटर (Rotavator) कल्टिव्हेटर (Cultivator), पाटा (Leveler)
उद्दिष्ट:
जमीन भुसभुशीत करणे, तणांचे नियंत्रण करणे, पेरणीसाठी योग्य बीजपलंग तयार करणे.
३ जुलै –
भात पिकासाठी रोपवाटिकेचा बीजपलंग तयार करणे (Preparation of Seed Bed Nursery for Rice Crop)
सुपीक व पाण्याची सोय असलेली जमीन निवडावी. जमीन नांगरून भुसभुशीत करावी.
शेणखत व आवश्यक रासायनिक खते मिसळावीत. 1–1.5 मीटर रुंदीचे व आवश्यक लांबीचे वाफे तयार करावेत.
प्रक्रिया केलेले बियाणे समान अंतराने पेरावे.
हलके पाणी द्यावे व आवश्यकतेनुसार तण व कीड नियंत्रण करावे.





