Wednesday, October 21, 2026
Homeगणराज्य दिनशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

image_pdfimage_print

 

मूल ( मेहुल मनियार )

       शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मा. सौ. सपनाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्राच्या हितासाठी झटलेल्या प्रत्येक महान आत्म्याला वंदन करीत त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थिनींना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्जनाचे महत्त्व आणि त्यामध्ये स्त्रीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

     महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर येथील सचिव मा. राजेश्वर सुरावार व कोषाध्यक्ष मा.अनिल दंडमवार  यांनी उपस्थिती दर्शवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रतिष्ठित नागरिक मा. जीवनभाऊ कोंतमवार व मा. सौ. सिंघवीताई यांचीही उपस्थिती लाभली.
याप्रसंगी भारतमाता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. वैष्णवी चिंतावार यांनी केले.
या कार्यक्रमास समस्त प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत शूरवी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सुयश!

 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय, मूल येथे देशभक्ती व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शूरवी महिला महाविद्यालया च्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

या नृत्यात कु. वैष्णवी गुरनुले, कु. अर्पिता मंडल, कु. ज्ञानेश्वरी लेंझे, कु. विशाखा नागपूरे, कु. सिद्धीका बुरांडे, कु. अलिशा पाल, कु. स्वीटी चाटारे, कु. साक्षी खोब्रागडे, कु. साक्षी गणवीर, कु. रैना रायपूरे, कु. कल्याणी शिंदे, कु. संस्कृती कंदिकूरवार, कु. वैष्णवी मोरे, कु. वैष्णवी तिमाडे, कु. दिक्षा घोगरे व कु. विद्या चहारे  यांनी सहभाग घेतला होता.
या प्रसंगी शूरवी महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष  सुदेश कुमार कापर्ती, सचिव  राजेश सुरावार व कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक केले.
विद्यार्थिनींसाठी नृत्य मार्गदर्शन प्रा. सौरभ तरारे व कु. स्वाती उत्तूरवार यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन नितेश गावतुरे व कु. टीना उरकुडे यांनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!