मूल (प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषी महाविद्यालय, मूलच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत कृषी कन्यांद्वारे सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही येथे चारा प्रक्रिया (Fodder Treatment) व पशुखाद्य व्यवस्थापन या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्याच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे तसेच पशुधनाचे पोषण, आरोग्य आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास प्रोत्साहन देणे हा होता.
हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे तसेच पशुसंवर्धन विषयतज्ज्ञ डॉ. मुन्नरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



