Thursday, October 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025काँग्रेस ची एकता समर्थ वाढत्या गुन्हेगारी वर लावणार लगाम
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

काँग्रेस ची एकता समर्थ वाढत्या गुन्हेगारी वर लावणार लगाम

image_pdfimage_print

मूल,

    मूल शहरातील मागील दोन ते तीन वर्षांत वाढत असलेल्या गुन्हेगारी मुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा विषय गंभीर बनला आहे. सत्ता असतांना सुद्धा सत्ताधारी भाजपकडून गुन्हेगारीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात अपयश आल्याची नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहे. चोरी, नशेचे वाढते व्यसन आणि युवकांची बेकायदेशीर धंद्याकडे होत असलेली ओढ यामुळे शहराची शांतता राहिली नाही. अशा स्थितीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांनी “शहरात पुन्हा कायदा-सुव्यवस्थेची ‘एकता’ प्रस्थापित करू” असा निर्धार व्यक्त केला आहे.

धक्कादायक घटनांची मालिका – मूल शहर हादरले
रस्त्यावर टॅली ठेवण्याच्या किरकोळ वादावरून विद्यार्थ्याची निर्घृण हत्या.

  पंचायत समिती कार्यालयासमोर युवकाची चाकूने हत्या.

 प्रेमसंबंधांना विरोध केल्याने प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच अटक केल्याने मोठा अनर्थ टळला.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांची हत्या

त्याच प्रमाणे गतवर्षी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाला होता. गेल्या वर्षभरात चाकूने वार करून चार तरुणांचा बळी गेला आहे.

    मूल शहरातील युवकांमध्ये नशेचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे.
दारू, गांजा आणि सहज पैसा कमावण्याच्या नादात अनेक तरुण अवैध धंद्यात गुंतत आहेत. शहरातील काही भागांत गांजा आणि अवैध दारू सहज उपलब्ध असल्याने विद्यार्थी देखील नशेच्या विळख्यात अडकत आहेत. याशिवाय जुगार, मटका व सट्ट्याच्या जाळ्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

महिलांची सुरक्षितता धोक्यात
गुन्हेगारी वाढल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
रात्री उशिरा प्रवास करणे, निर्जन भागातून जाणे किंवा बाजारपेठेतही बेछूट टोळक्यांच्या हालचालींमुळे महिला त्रस्त होत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी परिणामकारक उपाययोजना न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काँग्रेसची भूमिका 

एकता समर्थ यांचे आश्वासन
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांनी स्पष्ट केले—

 शहरातील पसरत चाललेल्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई, अवैध धंद्यांचे निर्मूलन करण्यासाठी विशेष मोहीम, महिलांसाठी सुरक्षित शहर उपक्रम
युवकांना नशेमुक्तीसाठी मार्गदर्शन व पुनर्वसन उपक्रम
स्मार्ट सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टीम
पोलिस व नगरपरिषद यांच्यात समन्वय वाढविणे

त्यांच्या मते, “मूल शहरात शांतता, सुरक्षितता आणि विकास हवा असेल तर प्रशासन पारदर्शक आणि बळकट असणे गरजेचे आहे.”

मूल शहरात वाढती गुन्हेगारी, नशेचे सावट, हिंसक घटनांची मालिका आणि असुरक्षिततेची भावना या सर्वांनी शहराच्या भविष्यासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नागरिक आता परिवर्तनाची अपेक्षा करत असून, काँग्रेसच्या एकता समर्थ या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेला नवा आयाम देऊन शहरात स्थैर्य व सुरक्षितता प्रस्थापित करण्यास सज्ज आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!