Wednesday, October 21, 2026
Homeराज्य स्तरीय स्पर्धाशिक्षकांच्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत नवभारत विद्यालयाचे भारत सलाम यांची निवड
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शिक्षकांच्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत नवभारत विद्यालयाचे भारत सलाम यांची निवड

image_pdfimage_print

नागपूर विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय यश…..परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…

मूल ( मेहुल मनियार )
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित केलेल्या नागपूर विभागीय शिक्षक पोस्टर स्पर्धेत नवभारत विद्यालय मुल येथील शिक्षक भारत हरिदास सलाम यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
भारत सलाम हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक म्हणून ओळखले जातात. अध्यापनासोबतच सहशालेय उपक्रम, चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अशोक झाडे , पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!