Thursday, October 22, 2026
Homeस्वच्छतामूल नगर परिषदेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर;३१ जानेवारीला मुदत संपणार!!!
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषदेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर;३१ जानेवारीला मुदत संपणार!!!

image_pdfimage_print

मूल

मूल नगर परिषदेच्या शहर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन कंत्राटाचा पेच पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती,त्यानंतर प्रशासनाने तीन महिन्यांसाठी अल्पकालीन निविदा काढली होती. मात्र, या निविदेची मुदत ३१ जानेवारी रोजी संपत असल्याने १ फेब्रुवारीपासून शहराच्या स्वच्छतेचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

​नगर परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता असून राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या सत्तासंघर्षामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबवताना किंवा मोठ्या निधीची तरतूद करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. मागील वेळी आमदारांच्या मध्यस्थीने तात्पुरता मार्ग निघाला होता, परंतु आता कायमस्वरूपी तोडगा निघणार की पुन्हा मुदतवाढीवरच काम चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​शहरात काही दिवसांपूर्वी आठवडी बाजाराजवळ कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली होती. स्थानिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्परता दाखवत कचरा उचलला असला, तरी कंत्राटाची मुदत संपल्यावर अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. ३१ जानेवारीनंतर स्वच्छता कर्मचारी आणि घंटागाड्यांची सेवा खंडित झाल्यास शहरात घाणीचे साम्राज्य पसरण्याची दाट शक्यता आहे.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध–नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ

​या सर्व पार्श्वभूमीवर, सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की,शहराचे आरोग्य आणि सौंदर्य धोक्यात येऊ दिले जाणार नाही. निधीसाठी पाठपुरावा करून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास थोडा वेळ लागत असल्यामुळे त्याकरिता दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!