Saturday, August 22, 2026
Homeहिन्दू सम्मेलनमुल येथे होणार विशाल 'हिंदू सम्मेलन'
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथे होणार विशाल ‘हिंदू सम्मेलन’

image_pdfimage_print

       विविध कार्यक्रमांची रेलचेल

मूल 

मुल शहरातील शिवाजी वस्ती तर्फे विशाल हिंदू संमेलन शनिवार दिनांक 7 मार्च 2026 ला गुजरी चौकाच्या पटांगणात होणार आहे, सदर हिंदू संमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून आयोजकांनी जय्यत तयारी चालवली आहे, दुपारी 3 वाजता महिलांची कलशयात्रा व विविध वेशभूषेत यात्रेचे आयोजन केले आहे, सायंकाळी 4.30 वाजता गोमाता पूजन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे, सायंकाळी 5 वाजता संत व वक्ता उदबोधन राहणार आहे, या संमेलनात श्री मुरलीधर धाम, कार्तिकस्वामी हनुमान मंदिर चे परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज हे उपस्थित राहणार आहेत, सोबतच श्री कृष्णाजी ठाकरे प्रांत कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ यांचे उदबोधन लाभणार आहे,  या नंतर महाआरती होईल व महाप्रसाद होणार आहे, परिसरातील सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज आयोजन समिती, शिवाजी महाराज वस्ती मुल यांनी केले आहे

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!