Sunday, June 21, 2026
Homeयोग दिवसकर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन

मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचलित, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी योगगुरू आचार्य गणेश मांडवकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व, विविध योगासने तसेच त्यांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम आदी विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक करून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. योगामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैली प्राप्त होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी डॉ. उज्वला कापगते तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण उपरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, NCC कॅडेट्स तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!