Wednesday, October 21, 2026
Homeनशामुक्त अभियानकृषि महाविद्यालय, मूल येथे ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय, मूल येथे ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

कृषि महाविद्यालय, मूल येथे दि. ६ ऑगस्ट, २०२६ रोजी भारत सरकार तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, युनिट मूल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाजनजागृती मोहिमे’ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रह्माकुमारी दीपा दीदी उपस्थित होत्या. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, युनिट मूलचे सहकारी सुरेश रायकंटीवार तसेच उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये मंचावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना दीपा दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व, व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम तसेच निरोगी व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी व्यसनमुक्तीची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेची माहिती देताना, व्यसन म्हणजे केवळ अमली पदार्थ नसून मोबाईलसह कोणतीही हानिकारक आसक्ती असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यसनमुक्तीचे पाच मंत्र — मोठी स्वप्ने, चांगले मित्र, चांगले विचार, चांगले चारित्र्य आणि दृढ निश्चय — प्रभावीपणे मांडले. तसेच, राजयोगाच्या माध्यमातून मनःशांती, आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि मनावर नियंत्रण प्राप्त करता येते, असे सांगून सकारात्मक चिंतनाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. सुरेश रायकंटीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करून घेतली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्हि. जी. अतकरे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत आत्मोन्नती, चारित्र्यनिर्माण आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही समान महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमानंतर ब्रह्माकुमारी युनिटच्या सदस्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. युनिटच्या वतीने कृषि महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे यांनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!