Tuesday, August 25, 2026
Homeलैगिक अत्याचारअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

       मूल पोलीस स्टेशन हद्दीतील मूल तालुक्यातील सिंताळा, येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 22 ऑगस्ट 2026 रोजी घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यातील पीडित अल्पवयीन मुलगी व सदर गुन्ह्यातील आरोपी देवराव तुकाराम वासेकर, वय 50 वर्षे, रा. सिंताळा, ता. मूल हे एकाच गावातील रहिवासी असून आरोपी हा पीडितेचा नात्याने चुलत आजोबा असल्याचे कळते.

दिनांक 22.08.2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता, पीडिता ही तिच्या आईच्या सांगण्यावरून आरोपीसोबत घरच्या शेतातील पाणी व पाटाच्या खांडी बुजविण्यासाठी शेताकडे जात होती. शेताच्या परिसरात आरोपीने पीडितेला पाटाची खांड बुजविण्यास सांगितले. पीडिता खांड बुजविण्यासाठी वाकलेली असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून तिच्याशी लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर पीडितेने सदर प्रकार तिच्या आईस सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मूल येथे अपराध क्रमांक 613/2026, कलम 64(2)(f)(I) BNS सह कलम 4 व 6 POCSO Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने तातडीने तपासाची कार्यवाही करून आरोपी देवराव तुकाराम वासेकर, वय 50 वर्षे, रा. सिंताळा, ता. मूल यास अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात  पोउपनि नरेश उरकुडे करीत आहेत.

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!