Wednesday, October 21, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठकसेवा संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चौरेचाळीसावी बैठक संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चौरेचाळीसावी बैठक संपन्न

image_pdfimage_print

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       कृषि महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चौरेचाळीसावी बैठक दिनांक २५ सप्टेंबर ,२०२६, शुक्रवार रोजी मूल तालुक्यातील दहेगाव येथे कृषि महाविद्यालय, मुल येथील  सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी दहेगाव येथील शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ उपस्थित होते. या बैठकीत मुख्यतेने “रब्बी हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणांचा वापर, फणस लागवड व एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनातून शाश्वत शेती” या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी कृषि महाविद्यालय, मुल येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांनी शेतकऱ्यांना हवामान बदलाला अनुरूप शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. बदलते तापमान, पावसातील अनियमितता आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करून रब्बी हंगामातील धान वाणांची निवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक हवामान व जमिनीच्या प्रकाराला अनुकूल वाणांची निवड आणि शेतीकामांचे योग्य नियोजन केल्यास उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण राखणे या दोन्ही बाबी शाश्वत शेतीसाठी आवश्यक आहेत. शेतीतील उपलब्ध सेंद्रिय अवशेषांचा योग्य वापर करून गांडूळखत निर्मिती केल्यास शेतावरच खताची उपलब्धता वाढविता येते असे त्यांनी सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनाच्या आधारे शेती केल्यास उत्पादनवाढीस चालना मिळून शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. केवळ उत्पादनवाढीवर भर न देता खर्चाचे नियोजन आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांद्वारे शेतीतील निव्वळ उत्पन्न वाढविण्याची गरजही त्यांच्या मार्गदर्शनातून अधोरेखित झाली.


श्री. शाम पतिंगे, वनस्पतिशास्त्र विषयतज्ञ यांनी रब्बी हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणांचा वापर हा पिकाची चांगली उगवण, निरोगी वाढ आणि अपेक्षित उत्पादन मिळविण्याचा महत्त्वाचा आधार आहे असे सांगितले. तसेच बियाणे खरेदी करताना प्रमाणित बियाणे व सत्यप्रतिचे बियाणे लागवडीसाठी वापरावे कारण ते बियाणे आनुवंशिक, भौतिकदृष्ट्या शुद्ध असते त्यामुळे उत्पादकता वाढण्यासाठी मदत होते असे त्यांनी सांगितले.
डॉ. शैलेन्द्र कडू, उद्यानविद्या विषयतज्ञ यांनी धान पिकाबरोबरच उपलब्ध जमीन, पाण्याची सोय व स्थानिक हवामान विचारात घेऊन भाजीपाला आणि फणस लागवडीचे नियोजन केल्यास जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर होऊ शकतो तसेच फणसाची लागवड करताना झाडांची भविष्यातील वाढ, सावली आणि मुख्य पिकावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जागेचे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. फणसापासून उत्पन्न मिळण्यासाठी सुरुवातीची काही वर्षे प्रतीक्षा करावी लागते आणि त्याचे उत्पादन हंगामी असते असे त्यांनी सांगितले. भाजीपाला उत्पादनातून अल्प कालावधीत उत्पन्न मिळू शकते, तर फणसासारख्या बहुवर्षायू फळझाडांमुळे भविष्यात हंगामी उत्पन्नाचा दीर्घकालीन स्रोत उपलब्ध होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. भूषण ठाकरे, कृषि किटकशास्त्र विषयतज्ञ यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल सखोल माहिती दिली.
सदर कार्यक्रमास एकुण २१ शेतकरी व ५ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री. अजय उईके, कृषि विस्तार शिक्षण विषयतज्ञ यांनी मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!