Thursday, October 22, 2026
Homeमूल नागपुर बसआज पासून मूल–नागपूर थेट एस. टी. बससेवा सुरू !
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आज पासून मूल–नागपूर थेट एस. टी. बससेवा सुरू !

image_pdfimage_print

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; 

मूल  ( मेहुल मनियार )

     मूल शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मूल–नागपूर थेट एस.टी. बस सेवा आज पासून सुरू झाली आहे. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागरिकांची मागणी गांभीर्याने घेत परिवहन विभागाकडे ठामपणे पाठपुरावा केल्याने या मागणीला यश मिळाले आहे.
मूल–नागपूर थेट बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, व्यापारी तसेच विविध कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपा मूल शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला. मूल–नागपूर बससेवा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता बससेवा सुरू झाल्याने मूल शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“दिला शब्द… केला पूर्ण!” या भावनेतून मूलकरांच्या दैनंदिन प्रवासाशी जोडलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या बससेवेमुळे नागपूरला शिक्षण, उपचार, रोजगार, व्यवसाय व शासकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मूल शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!