Thursday, October 22, 2026
Homeवन्यजीव सप्ताहशूरवी महिला महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन व सर्पजागृती मार्गदर्शन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन व सर्पजागृती मार्गदर्शन

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

     संजीवन पर्यावरण संस्था, मूल यांच्या वतीने आज शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे विद्यार्थिनींसाठी वन्यजीव संवर्धन, वन्यजीवांची काळजी तसेच सापांची ओळख, सर्पदंशाच्या वेळी घ्यावयाची काळजी व प्राथमिक उपचार याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात वन्यजीव प्रेमी श्री. उमेशसिंग झिरे यांनी विद्यार्थिनींना विविध वन्यजीवांविषयी माहिती देत त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच सापांच्या विविध प्रजातींची ओळख, सापांपासून घ्यावयाची सुरक्षितता, सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी आणि उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी माहितीपूर्ण उत्तरे देत वन्यजीवांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे सहकारीही उपस्थित होते.

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन स. प्रा. सूर्यकांत सहारे यांनी केले.

वन्यजीवांबद्दल विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच मानव-वन्यजीव सहअस्तित्व, सर्पसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!