Thursday, October 22, 2026
HomeNCMC cardप्रवाशांच्या सवलतीसाठी सुरू केलेले NCMC कार्ड डोकेदुखी ठरत आहे
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रवाशांच्या सवलतीसाठी सुरू केलेले NCMC कार्ड डोकेदुखी ठरत आहे

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार ).

      महाराष्ट्र राज्य परिवहन निगम द्वारा महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड योजना लागू केली आहे. परंतु काही कारणामुळे ही योजना प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एनसीएमसी कार्ड  मध्ये भरपूर रक्कम शिल्लक असतानाही प्रवाशांकडे असलेले एनसीएमसी कार्ड तिकीट काढण्याकरिता वाहक कडे सादर केले असता तिकीट निघत नाही, ज्यामुळे प्रवाशाला पूर्ण तिकीट घेण्याचा आग्रह केला जात आहे. जर तिकीट काढली नाही तर बस मधून उतरविण्यात येईल ही भाषा वापरली जात आहे. NCMC  कार्ड मध्ये पैसे असताना सुद्धा सर्वर डाउन किंवा इतर कारणामुळे तिकीट न निघणे हा प्रवाशांचा दोष नाही असे जागृत ग्राहक राजा चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी म्हटले आहे. योजना लागू झाली असतांना सुध्दा महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे नुकसान होत आहे व या एनसिएमसी कार्ड मुळे प्रवाशांच्या डोक्याला नुसताच ताप झालेला आहे ,कारण काय तर कार्ड सोबत ठेवा ,कार्डमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक ठेवा आणि वरुन पुन्हा अशाप्रकारे पुन्हा आपणच गुन्हेगार असल्याप्रमाणे चार गोष्टी ऐकून घेत बसमधून उतरवण्याची भाषा ऐका किती मनस्ताप होतो .

त्यामुळे महिला व जेष्ठ नागरिक यांचेसह एनसिएमसी कार्ड त्यात शिल्लक रक्कम असताना सुद्धा वाहकांकडून जर प्रवाशांना अशा प्रकारे नाहक त्रास दिला जात असेल तर ही बाब अतिशय गंभीर असून महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्याआधी आपल्या वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण करून अशाप्रकारे कार्ड असताना कोणत्याही प्रवाशाला विनाकारण धमकीवजा दपटशाही आणि नाहक त्रास होणार नाही . बस प्रवासात नेटवर्क इश्यू असेल आणि कार्ड मधून तिकीट निघत नसेल तर या संभाव्य त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न व तोपर्यंत या कार्डच्या वापराची सक्ती करु नये, आणि प्रवाशांसोबत अशाप्रकारे वर्तन असू नये अशी सक्त सुचना देण्यात यावी, अशी मागणी दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी चंद्रपूर आगार व्यवस्थापक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उच्चाधिकारी व परिवहन मंत्री यांचेकडे केली आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!