Wednesday, October 21, 2026
Homeआरोग्य शिबीरकृषि महाविद्यालय, मूल येथे वैद्यकीय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रेबीज प्रतिबंधक...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय, मूल येथे वैद्यकीय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रेबीज प्रतिबंधक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

कृषि महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रेबीज प्रतिबंधक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथील डॉ. विस्मय देवतळे (वैद्यकीय अधिकारी) आणि श्रीमती अश्विनी अशोक येम्बरवार (सिकलसेल प्रयोगशाळा प्रमुख) उपस्थित होते. तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील रक्तसंकलन पथक उपस्थित होते. या पथकामध्ये डॉ. प्रणल रामटेके (रक्त संक्रमण अधिकारी), श्रीमती योगिता माळी (समाजसेवा अधीक्षक), श्री. उज्वल जावंजाळ (अधीपरिचारक), श्रीमती रूपाली येनूरकर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्रीमती तानिका आंबटकर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री. विजय कोटावार (कक्षसेवक) आणि श्री. रुपेश घुमे (वाहनचालक) यांचा समावेश होता.

या कार्यक्रमांतर्गत एकूण ४४ विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली, तर रक्तदान शिबिरामध्ये एकूण १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. विस्मय देवतळे यांनी रेबीज आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केली. डॉ. प्रणल रामटेके यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच रक्तदानाबाबत समाजात प्रचलित असलेल्या गैरसमजुतींविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी आरोग्याचे महत्त्व, रक्तदानाचे महत्त्व आणि रेबीज आजाराविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे यांच्यासह कृषि महाविद्यालय, मूल येथील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .श्रुती सातपुते आणि कु.सृष्टी जैस्वाल यांनी केले, तर युगांत हुकरे यांनी आभारप्रदर्शन केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!