Thursday, October 22, 2026
Homeजागतिक महिला दिवसमहिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे” – प्राचार्य डॉ. अनिता वाळके
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे” – प्राचार्य डॉ. अनिता वाळके

image_pdfimage_print

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
मूल ( मेहुल मनियार )

      शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती चंद्रकला लाटकर (घोसरी), श्रीमती प्रियंका नर्मलवार (सरपंच, उसराळा) तसेच श्रीमती शारदा उत्तम ढोले(समाजसेविका)उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. उज्वला कापगते, प्रा. श्वेता दुर्गे, प्रा. सोनम शेंडे व प्रा. अरुणा उमरे उपस्थित होते.
डॉ. उज्वला कापगते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून जागतिक महिला दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. तसेच विद्यार्थ्यांनी महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या हस्ते प्रमुख अतिथी श्रीमती चंद्रकला लाटकर, श्रीमती प्रियांका नर्मलवार व श्रीमती शारदा उत्तम ढोले यांचा त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी सांगितले की,“आजच्या काळात महिलांनी शिक्षण, प्रशासन, राजकारण, उद्योग, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने व खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात वाढत असलेल्या स्त्री अत्याचारामागील विकृत मानसिकता रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने संवेदनशीलतेने व सजगतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
प्रमुख अतिथी श्रीमती चंद्रकला लाटकर, सरपंच प्रियांका नर्मलवार व श्रीमती शारदा उत्तम ढोले यांनीही आपल्या मनोगतात महिलांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि आत्मनिर्भरतेबाबत प्रेरणादायी अनुभव सांगितले. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन व सामाजिक जागरूकतेच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी प्रा. श्वेता दुर्गे यांनी मूल परिसरात वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधत विद्यार्थिनींनी सजग व आत्मविश्वासाने राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोमेश देशमुख यांनी केले, तर डॉ. गणेश आगलावे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!